पोलीस ठाणे एम.आय.डी.सी अंतर्गत फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.
नागपुर : दिनांक ०६.११.२०१३ चे १४.०० वा. दि. ०८.१०.२०२२ दरम्यान फिर्यादी स्वप्नील तेजराम वानखेडे वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं. ३, डबाले ले-आउट, त्रिमूर्ती नगर, नागपूर यांनी व त्यांचे वडील यांनी असे दोघांनी मिळुन आरोपी लखन भोजराज सोनवने वय ६४ वर्ष रा. जलविहार कॉलोनी, हिंगणा टि पॉईट, नागपूर यांचेकडुन एम. आय. डी. सी हद्दीतील खसरा क्र. ३४ / १,३४ / ३,४ या फ्लॅट स्कीम मधील १०३, १०४ असे दोन फ्लॅट बुक करून दोघांनी आरोपीस ४ लाख रूपये देवुन करारनामा केला होता. आरोपी याने मटेरीयलची किमत वाढली आहे असे सांगुन फिर्यादीस व त्यांचे वडीलांस फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. आरोपीने मटेरीयलची किमत वाढली म्हणुन फिर्यादी व त्यांचे वडीलांकडुन असे एकुण ६ लाख रूपये पुन्हा घेतले. आरोपीने फिर्यादी व त्यांचे वडीलांकडुन रक्कम घेवुन फ्लॅटचे विकीपत्र न करून देता ते परस्पर दुसऱ्या व्यक्तीना विक्री करून फिर्यादी व त्यांचे वडीलांची १० लाख रूपयाची फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशी वरून पोलीस ठाणे एम. आय. डी. सी येथे सपोनि घुगल यांनी आरोपीविरूध्द कलम ४०६, ४२० भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.