जादूटोणाविरोधी कायद्याची जनसंवाद यात्रा नागपुरात
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या 10 व्या स्मृती दिना निमित तसेच जादुटोणा विरोधी कायद्यालाही 10 वर्षे पूर्ण होत आहेत. कायद्याला 10 वर्षे पूर्ण झाली. या यात्रेची सुरवात 20 ऑगस्ट 23 ला झाली जिथे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला. त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मा. पोलीस संचालक श्री अशोक धिवरे यांनी गाडीला झेंडा दाखवून या राज्यव्यापी जनसंवाद यात्रेस प्रारंभ झाला. पुणे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा वरून आज नागपूरात आगमन होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व भागात पुढील कार्यक्रमाचे आयोजन केले असून याचा समारोप नोंव्हेबर मध्ये करण्यात येणार आहे.
कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हा कायदा व्हावा म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी 18 वर्षे लढा उभारून यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. ते हयात असताना त्यांचा खून झाला. त्यानंतर लगेचच " जादुटोना विरोधी कायद्या पारित करण्यात आला. या कायद्या अंतर्गत आतापर्यत 1200 च्या वरती गुन्हे दाखल झाले आहेत.
या कायद्याची नियमावलीही बनवण्यात आली नाही. महाराष्ट्रात अंधश्रध्देपोटी अनेक लोकांचे शोषण व फसवणूक होत आहे. कायद्याचे अज्ञान असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. या कायद्या अंतर्गत दक्षता अधिकारी म्हणून त्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्याना जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागत आहे. कायद्याचे प्रशिक्षण
राज्यव्यापी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हयामध्ये रोज 4 ते 5 कार्यक्रमाचे आयोजन ,शाळा, कॉलेज, पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला, बुद्ध विहारात कार्यक्रमाचे आयोजन करत असून त्यामाध्यामातून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यक्रमाचे आयोजन केले जात. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 90 दिवस ही राजव्यापी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले असून यासाठी शासनाकडून एक रुपयाची अपेक्षा न करता महाराष्ट्र अंनिसतर्फे याचा सर्व खर्च करण्यात येत आहे. यात एक गाडी सजवून त्याला सर्व कायद्याची कलमे( अनुसूचि) चित्रमय पोस्टर लावण्यात आली आहे. त्यामुळे तो कायदा सर्वसामान्य लोकांना कळत आहे.
अधिक माहिती साठी संपर्क रामभाऊ डोंगरे( नागपूर) महा.अंनिस राज्यकार्यकारिणी सदस्य,9404084033