स्व.दामोधर गोपालराव कोलते यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ शिक्षक दिवस समारोह
श्रद्धा क्रीड़ा व सांस्कृतिक मंडळ आणि रयु क्यू शोरीन रयु कराटे दो या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 10 सप्टेंबर रोजी दामोधर कोलते सभागृह, गोधनी रोड, 4 ब्रदर्स रेस्टोरेंट जवळ नागपुर. येथे "शिक्षक दिवस समारोह" घेण्याचे ठरवले आहे. या विशेष दिनी "चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा & नाटक /भूमिका / प्रतिभा स्पर्धा घेण्यात आली आहे. विजयी झालेल्या विद्यार्थाना विशेष बक्षीसे देण्यात आले. या कार्यक्रमत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कोलते सभागृह संचालक रुमाबाई कोलते, राजकुमार कोलते, सिद्धूधन कोलते, संजय कोलते, नागपुर बाज़ार पत्रिका च्या संचालक समता गणवीर, संस्थेचे प्रमुख क्योशी संजय महाजन, सेंसेई समीप नरुले, सेंसेई निलेश मिश्रा, सेंसेई सूरज गोड़े, सेंसेई प्रशांत मानकर, सेंसेई आशीष कतोरे, सेंसेई भावेश गोखरे, सौ.आरती मधुमटके, सौ. योगिता सोनकुसरे, मुकेश माकरवार, सौ. गुदड़े मैडम, तस्लीम मैडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रियल, पंकज, लावण्या, ज़ेहरा, तंजीम, भावना, नूपुर, मानसी, प्रज्वल, प्रियांशु, राशी, महिमा, शुभांगी, अथक परिश्रम यांनी घेतले.असे सुरज गोडे यांनी सांगितले.