राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अंगणवाडी मुलांना मिळाला न्याय
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 हिंगणघाट येथील मुजुमदार वार्ड येथील नेहरू शाळेमध्ये दोन अंगणवाडी असून त्या अंगणवाडीमध्ये 100 पेक्षा जास्त लहान मुलं शिकतात. या अंगणवाडीच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेमध्ये नगरपरिषद प्रशासन हिंगणघाट यांनी कचरा डेपो बांधकाम करून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता .या गोष्टीची भनक लागतात व या संबंधात पालकांची तक्रार येताच शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड सुधीरबाबु कोठारी ,माजी आमदार राजूभाऊ तिमांडे , सौरभभाऊ तिमांडे ,किरीटजी शेषपाल ,गोविंदजी पुरोहित , ललितजी जोशी व अन्य कार्यकर्ते घटनास्थळावर पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर कचरा डेपो उभारणे म्हणजे अंगणवाडी येथील बालकांच्या आरोग्याची खेळ खंडोबा होईल हे स्पष्ट निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या परिसरात कचरा डेपो बांधकाम होणार नाही अशी भूमिका घेतली. त्या संबंधात अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रविणभाऊ काळे ,मदनजी मशालकर यांना घटनास्थळावर बोलावून हे त्यांच्या नजरेत आणून दिले. त्यामुळे सदर अधिकारी व कर्मचारी सुद्धा थबकले .शेवट या संबंधात नगरपरिषेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी मौखिकरित्या सदर जागेवर कचऱ्याच्या डेपोचे बांधकाम होणार नाही असे आश्वासन दिल्याचे समजते. विशेष म्हणजे सदर कचरा डेपो काळी सळक वर असलेल्या एका प्रशस्त जागेवरून स्थानांतरित केल्या जात होता. त्याबद्दल विशेष प्रेम दाखवून असा वेगळा प्रकार करण्याचा बेत आखला गेला होता. परंतु वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने व बांधकाम होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिल्याने शेवट प्रशासनाला नमते घ्यावे लागले व झालेला निर्णय मागे घेत आहे असे मौखिक आश्वासन दिल्याने हा प्रकरण सध्यातरी थांबला आहे .याबाबत राष्ट्रवादीचे नेते अँड सुधीरबाबु कोठारी यांनी थेट बांधकामाचे इस्टिमेट, बांधकामाची परवानगी व अन्य डॉक्युमेंट दाखवा असे उपस्थित नगरपरिषद अधिकाऱ्यांना सांगितले .तेव्हा हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे असे सांगून या प्रकाराची सत्यता उघडकीस आली. मौखिक आदेश दिल्यामुळे तूर्तास अंगणवाडी बालकांचे आरोग्य सध्या तरी धोक्यात येणार नाही. तसेच ज्या परिसरात कचऱ्याचा डेपो सुरू होत होता .तिथे खुले मैदान असून त्यासोबत त्याच परिसरात नगरपरिषद द्वारे संचालित नेहरू शाळा सुद्धा आहे अशा ऐतिहासिक परिसरात कचऱ्याचा ढोला उभारणे म्हणजे स्वच्छ परिसराला अस्वच्छतेच्या स्वरूप आणणे होता .परंतु वेळीस राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने पावले उचलून हे प्रश्न निकालीस आल्याने उपस्थित वार्डातील नागरिकांनी सुटकेच्या नि:स्वास सोडला.