*विश्व केसरी फाउंडेशन तर्फे कट्यार काळजात घुसली.*..चा प्रयोग सादर
नागपूर : नुकत्याच झालेल्या ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुरेशभट सभागृहात विश्व केसरी फाउंडेशन व स्वरवेध नागपूर आयोजित कट्यार काळजात घुसली या नाट्य संगीताचा यशस्वी प्रयोग नागपूरकरांसाठी सादर करण्यात आला होता. कार्यक्रमाला खुप मोठ्या संख्येने प्रेक्षक आवर्जून उपस्थित होते. नागपुरातील मान्यवर मंडळींनी सुद्धा या प्रयोगाला हजेरी लावली होती. विश्व केसरी फाउंडेशन ही नागपुरातील अग्रगण्य संस्था असून समाजातील अत्यंत गरीब व गरजू बांधवांना शैक्षणिक, आरोग्यासाठी, निराधार वृद्धांना आर्थिक मदत करते.
जास्तीत जास्त निधी संकलित व्हावा व त्या माध्यमातून जास्तीत जास्त हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करता यावी या करिता विश्व केसरी नेहमी प्रयत्नशील असते. निधी संकलनाचा उद्देश ठेवून विश्व केसरी फाउंडेशन अनेक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असते.
असाच शैक्षणिक मदतीचा मानस ठेवून विश्व केसरी फाउंडेशन व स्वरवेध नागपूर आयोजित मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणाऱ्या दैदिप्यमान, अभिजात आणि अजरामर संगीत नाटकाची उत्कट प्रचिती देणारा दर्जेदार कार्यक्रम 'कट्यार काळजात घुसली...एक अनुभूती ' या नाट्य संगीताचा प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन ॲडव्होकेट भानुदास कुळकर्णी व सारंग मास्टे यांचे असून संगीत संयोजन ॲडव्होकेट भानुदास कुळकर्णी यांचे होते. नेपथ्य व रंगमंच व्यवस्था माधव घोडवैदय यांची होती. शंतनु ठेंगडी, आसावरी रामेकर जोशी, केतकी काणे सालनकर, ललित घवघवे, सागर पंडित, प्रद्युम्न बायस्कर, रोहित घांग्रेकर, अभिलाष भुसारी, निखिल टोंगळे यांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली.
तर महाराष्ट्राचा महागायक अनिरुद्ध जोशी, डॉ. मंजिरी वैद्य अय्यर, यश खेर, आदित्य सावरकर, श्रुती बाईवार यांनी उपस्थितांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. अनेक वेळा नाटकातील अनेक गाण्यांना रसिकां तर्फे 'once more' मिळाले. विश्व केसरी फाउंडेशनच्या संपूर्ण चमूने या कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले.