श्री महालक्ष्मी जगदंबा देवी, कोराडी ची पायीवारी बुधवार दि. १८ आक्टो. रोजी निघणार -
नागपुर/कोराडी. कोराडी पायीवारी १८ आक्टो. २३ रोजी सकाळी ७.३० वाजता श्री लक्ष्मी नारायण मंदिर, धरमपेठ, नागपूर येथून निघेल. पायीवारी चा मार्ग - श्री लक्ष्मी नारायण मंदिर, धरमपेठ - वेस्ट हायकोर्ट रोड - सरळ विद्दूत भवन चे मागे श्री दंडे यांच्या घरी भजन व चहापान नंतर पागलखाना चौक - कोराडी रोड वरील विठ्ठल मंदिर येथे चहापान- कोराडी मंदिर महाद्वार - मंदिर परीसरातील श्री हनुमान मंदिर येथे थोडावेळ विश्रांती व देवस्थान ने दिलेल्या मार्गाने देवीचे दर्शन. पायीवारी सहभागी होणाऱ्या वारकर्यानी सोबत जेवणाचा डबा, पाण्याची बाटली व केशरी टोपी, महिलांनी केशरी स्कार्फ आणावा. सहभागी होणाऱ्या वारकर्यानी सोबत मौल्यवान दागिने व वस्तू आणू नयेत. दुपारी ३.३० पर्यंत वारी संपन्न होईल. येतांना आपल्या खर्चाने नागपूरला परत.