सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भिमराव ते बाबासाहेब हा जडणघडणीचा प्रवास सामाजिक न्याय खाते उलगडणार - ना रामदासजी आठवले

 भिमराव ते बाबासाहेब हा जडणघडणीचा प्रवास सामाजिक न्याय खाते उलगडणार - ना रामदासजी आठवले

 चित्रपट वेबसीरीज प्रकल्पास कुठलाही निधी कमी पडू देणार नाही.

नागपूर दि२३: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केलेले दादाजी केळूसकर, सुरबा नाना टिपणीस, राजर्षी शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकारांशी असलेला सहवास आणि त्यातून दिसून आलेला सोशल इंजिनियरींग या उपक्रमामधे दिसून येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भिमराव ते बाबासाहेब हा चित्रपट वेबसिरीज सुरु करण्यासाठी तात्काळ पत्र देणार असल्याचे अभिवचन ना. रामदास आठवले यांनी डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांना दिले. महत्वकांक्षी प्रकल्पाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील ज्या ज्या देशामध्ये जाऊन त्यांने उच्च शिक्षण घेतले त्यांच्या सहवासाच्या ठिकाणाचा शोध आणि बोध या प्रकल्पाव्दारे घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बार्टीच्या समता रॅलीस संबोधित केले. 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता रॅली बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी समाजिक न्याय विभाग ते दीक्षाभूमी पर्यंत करण्यात आले होते. 

याप्रसंगी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी तथागत भगवान गौतम बुध्द, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना बार्टी संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टी संस्थेचे महासंचालक मा. सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बार्टी संस्थेच्या वतीने विविध योजना व उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून भिमराव ते बाबासाहेब हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी ना. रामदासजी आठवले यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले. बार्टीच्या समता रॅलीचे उद्घाटन केल्याबद्दल ना. आठवले यांचे आभार मानले. 

यावेळी बार्टी संस्थेचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, पुणे बार्टीच्या कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, बार्टी नागपूरचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, भन्तेगण, रिपाईचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, दयाल भादूरे, राजन वाघमारे, प्रवीण मोरे, प्रकल्प अधिकारी तुषार सुर्यवंशी, शीतल गडलिंग, सुनीता झाडे, प्रकल्प समन्वयक नागेश वाहूरवाघ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरीता महाजन, रामदास लोखंडे, आकाश कुर्‍हाडे, मंगेश चहांदे यांच्यासह बार्टीच्या विविध योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी, प्रशिक्षक बार्टीतील अधिकारी व कर्मचारी, अनुयायी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सतीश सोमकुंवर बार्टीचे तर आभार प्रादेशिक कार्यालय बार्टी नागपूरचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी केले. 


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...