मेरी माटी मेरा देश सारख्या उपक्रमांमुळे युवा पिढींमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होईल - खा.रामदास तडस
मेरी माटी मेरा देश सारख्या उपक्रमांमुळे युवा पिढींमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होईल - खा.रामदास तडस
मेरी माटी मेरा देश उपक्रमाचा समारोप
जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा समारंभ
अमृत कलश राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी रवाना
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि.29 : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक शुरविरांनी बलीदान दिले. त्यांच्या बलीदानाची आठवण आजच्या तरुणांमध्ये कायम स्मरणात राहण्यासोबतच युवा पिढीमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होण्यासाठी मेरी माटी मेरा देश हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन खा.रामदास तडस यांनी केले.
जिल्हा क्रिडा संकुल येथील सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेरी माटी मेरा देश उपक्रमाच्या जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकरी अमोल भोसले, अभियानाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, नगर पालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त हर्षल गायकवाड, विभागप्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग वर्धा येथून फुंकले. त्यामुळे वर्धा जिल्हा स्वातंत्र्याच्या चळवळीचा केंद्रबिंदू होता. स्वातंत्र्य चळवळीत येथील लोकांनी बलीदान दिले. त्यांचे हे बलीदान पुढील पिढीच्या कायमस्वरुपी स्मरणात राहण्यासाठी देशातील 7 हजार 500 गावातील माती कलशामध्ये गोळा करुन दिल्ली येथे नेली जाणार आहे. या मातीतून स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ तयार करण्यात येणार असलेल्या अमृतवाटीकेद्वारे स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान पुढील पिढीस कायम स्मरणात राहील, असे श्री.तडस म्हणाले.
स्वातंत्र्य चळवळीतील शहीदांचे बलीदान व्यर्थ जाऊ नये. देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे व शहीदांप्रती नागरिकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी. या संकल्पनेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये देशाच्याf स्वातंत्र्याप्रती आपुलकीची भावना जागृत होऊन आजचा युवक गतीमान होईल, असे आ.दादाराव केचे म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीत विरांना वंदन करण्यासाठी व आपल्या माती बद्दल प्रेम व देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्याठी मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्याहस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या विरमाता, विरपत्नींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्ञानदा फणसे यांनी केले तर संचालन ज्योती भगत यांनी केले. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व पंचायत समित्यांच्यावतीने जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले.
जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा
तत्पुर्वी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे अमृत कलश जिल्हा परिषदेत आणण्यात आले. सर्व कलशाची जिल्हा परिषद येथून तसेच सर्व नगर परिषद येथून आलेल्या कलशाची यात्रा जिल्हाधिकारी कार्यालय येथून काढण्यात आली. या कलश यात्रेमध्ये खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, सर्व तालुक्यांचे अधिकारी गटविकास अधिकारी उपस्थित होते. क्रीडा संकुल येथील मुख्य कार्यक्रमस्थळी सर्व कलश मान्यवरांना सुपूर्द करण्यात आले. सदर कलश सायंकाळी स्वयंसेवकांमार्फत मुबंई येथे होणाऱ्या कार्यक्रमासासाठी रवाना करण्यात आले.