धम्माची मशाल राजकारणी लोकांच्या हाती देऊ नका ती मशाल धम्म योद्धा च्या हातीच सुरक्षित आहे.
येवला: दि.१३ ऑक्टो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले होते. राजकारण्याचे नाही, त्यासाठी भारतीय संविधानच फार आहे. आमच्या नेत्यांनी धम्माचे कार्य सोडून राजकारणाचा साठी आपले तत्वाला तिलांजली देऊन प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या दरवाजावर लोटांगण घालण्यात आयुष्य घालवत आहेत. धम्माची मशाल राजकारणी लोकांच्या हाती देऊ नका, ती मशाल धम्म योद्धा च्या हातीच सुरक्षित आहे. असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. ते धम्म घोषणा दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती भूमी येवला भिम स्तंभा जवळ भिम योद्धा सन्मान सोहळा कार्यक्रमात भिम योद्धा सन्मान पुरस्कार प्रदान करतेवेळी बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी आंबेडकरी महिला मोर्चा उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा कल्पना दोंदे तर उद्घाटक म्हणून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय महासचिव उद्धव तायडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छोटूलाल मोरे, धुळे जिल्हा अध्यक्ष विजय मोरे, आंबेडकरी महिला मोर्चा नाशिक जिल्हा पदाधिकारी प्रा.मीना पवार, मनमाड पदाधिकारी कैलास खडताडे, महिला मोर्चा मुंबई प्रदेश अध्यक्षा पौर्णिमा पाईकराव, बोरिवली शाखा अध्यक्षा संगिता जैस्वार, जनसंपर्क प्रमुख डॉ. कुष्णा बेडसे, विदर्भ प्रदेश प्रवक्ते बौद्ध धर्मा बागडे, येवला तालुका अध्यक्ष जालंदर खैरनार कोपरगाव अध्यक्ष अजय जगताप, औरंगाबाद महिला मोर्चा अध्यक्षा शालू भोकरे, अहमदनगर महिला मोर्चा अध्यक्ष सुनिता दाभाडे, निफाड तालुका अध्यक्ष सागर निकाळजे, शिर्डी शमोन जगताप, दिंडोरी तालुका अध्यक्ष राजरत्न पगारे, गुडू रंगारी, आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.