डॉ. वैशाली टालाटुले राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाअध्यक्षा
नागपूर, प्रतिनीधी .महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. वैशाली टालाटुले यांची निवडण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले.
या कार्यक्रामला राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजु राउत, ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. अनिल ठाकरे, काटोल पंचायत समीतीचे सभापती संजय डांगोरे, जिल्हा परियषद सदस्या दिक्षा मुलताईकर, युवतीच्या अध्यक्षा रश्मी आरघोडे, नंदु मोवाडे, नितीन ठवळे, धनराज भड, प्रभाकर साठे, नितेश कोवे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थीत होत्या. यावेळी बोलतांना डॉ. वैशाली टालाटुले यांनी सांगीतले की, जिल्हयात महिला संघटन वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांचे आज अनेक प्रश्न आहेत. वाढती महागाई, महिलांवर होणारे अत्याचार, बेपत्ता होत असलेल्या तरुणी – महिला यासह अनेक प्रश्न आज एैरणीवर आहे. त्याला वाच्या फोडण्याचे काम पुढील काळात कराचे आहे. सुरुवातीला महिला संघटना वाढीवर आपला भर राहणार आहे. या पदाची जवाबदारी दिल्याबदल डॉ. वैशाली टालाटुले यांनी खा. शरदचंद्र पवार साहेब, खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, महिला अध्यक्ष रोहीणी खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग यांचे आभार मानले आहे.