उमरी चौ. येथे राष्ट्रपिता म.गांधी आणि 'माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी
प्रेमानंद हटवार तालुका प्रतिनिधी उमरी चौ:- सत्य, अहिंसा व सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच 'जय जवान जय किसान' चा नारा देऊन देशाला एकत्र आणणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय उमरी चौ.येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ. निकिता हेमणे ,उपसरपंच श्री.यशवंत सोनटक्के यांच्या हस्ते दोन्ही विभूतींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वछता दिनाचे अवचित्य साधून एक तास श्रमदान अंतर्गत उमरी गावातील काही परिसर स्वछता करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित उमरी च्या प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंच सौ.निकिता हेमणे, उपसरपंच श्री.यशवंत सोनटक्के ग्राम. सदस्य योगिता खरकाटे ,दिपाली भुते ,रोशनी मेश्राम , मन्साराम मेंढे ,नानाजी हेमने ,ग्रामसेवक बारसागडे सर , शिपाई मुकुंदा पिल्लेवान ,संगणक परिचालक पंकज हेमने , रोजगार सेवक संदीप हेमणे ,आशा वर्कर रेखा पिल्हेवाण तसेच ग्रामपंचायत पदाअधिकारी आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .