पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते मदनी येथे ४४ लाख रुपये विकासकामांचे भूमिपूजन
🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा : वर्धा तालुक्यातील मदनी येथे वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते ४४ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन झाले.
भुमिपूजनप्रसंगी खा.रामदास तडस, आ.समीर कुणावर, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमीत वानखडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसीलदार रमेश कोळपे, राजेश बकाने आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते मदनी येथील रस्ता बांधकाम, विठ्ठल रुख्मिनी मंदिरच्या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मदनी येथील वडार वस्ती येथे रस्ता बांधकामाच्या भुमीपूजन प्रसंगी बोलतांना पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी वडार वस्तीतील नागरिकांना जमिनीच्या पट्टे वाटपाचा प्रश्न लवकरच निकाली लावून पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्क प्रदान करण्यात येईल, असे सांगितले.
सर्वसामान्य गोरगरीब पात्र नागरिकांना प्राधान्याने पट्टे देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे गरजूंना घरांसाठी जागा उपलब्ध होईल, असे ते पुढे बोलतांना म्हणाले. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वे तातडीने केले जात आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री म्हणून वर्धा येथे पहिल्यांदाच आगमण झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुतमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ.डॅा.पंकज भोयर, आ.समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे उपस्थित होते.