सामाजिक कार्यकर्ता अलका कांबळे यांच्या शिष्टमंडळाने नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
सामाजिक कार्यकर्ता अलका कांबळे यांच्या शिष्टमंडळाने नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
नागपूर मध्ये दरवर्षी साजरा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा दरवर्षी अपुऱ्या पडतात असा अनुभव आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातून नाही तर देशाच्या बाहेरून लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात मात्र त्यांना सुलभ शौचालय,भागातील विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अपुरी सुरक्षा व्यवस्था सारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावा लागतं. देशभरातून येणारा बौद्ध अनुयायांमध्ये या निमित्ताने एक चुकीचा मेसेज जातो यामुळे शहराची पर्यायांना महापालिकेची देखील बदनामी होते. नागपूरसाठी भूषणावह असलेला हा सोहळा नागपूर महानगरपालिकेने गांभीर्याने घेऊन बौद्ध अनुयायांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्या काही गोष्टी महानगरपालिकेला शक्य नसतील तर सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्यापूर्वी जेणेकरून बौद्ध बांधव नागपुरातून गोड आठवणी सोबत घेऊन जाऊन नागपूर शहराचा नावलौकिक करेल यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता अलका कांबळे यांच्या शिष्टमंडळाने नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वरील सर्व गोष्टींना गांभीर्याने घेण्याची विनंती केली.