75 दिवसांचा फिटनेस कार्यक्रम - “फिट राइज 75” चा वर्धा पोलीस दलातर्फे शुभारंभ.
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
“सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी” हैदराबाद यांच्या द्वारे आयोजित करण्यात आलेल्या व केंद्रीय गृह मंत्री, भारत सरकार मा.ना. श्री. अमित शहा यांच्या शुभ हस्ते “फिट राइज 75” या 75 दिवसीय फिटनेस कार्यक्रमाचा “फ्लॅग ऑफ समारंभ” दि २७-१०-२०२३ रोजी सकाळी 09:30 वा. संपन्न झाला. त्या अनुषंगाने, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन यांच्या शुभ हस्ते “फिट राइज 75” या फिटनेस कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा प्रत्येक सहभागी सदस्यांना नियमित व सात्यत्यपुर्ण सहभागाअंती ५ किमी अंतर सहज धावण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतःची शारीरिक क्षमता विकसीत करणे हा आहे. सदर स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्यातील ४८ अधिकारी, ४४२ पोलीस अंमलदार व पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी प्रत्यक्ष भाग घेवून ५ किमी अंतराची रनींग पूर्ण केली असुन मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी प्रथम येणाऱ्या दहा स्पर्धकांमध्ये स्वतः चे स्थान निश्चित केले आहे. सदर स्पर्धेमध्ये पुरुष स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक- प्रद्युम्न फड, द्वितीय - अंकित जिभे, तृतीय मनोज सावरबांदे तसेच महिला स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक - सुनैना डोंगरे, द्वितीय - जयश्री बावणे, तृतीय अलका राठोड यांनी पटकावला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना येत्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमधील उर्वरित स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा नूरूल हसन यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे आभार मानले व पोलीस विभागामध्ये फिटनेस खुप महत्वाचा भाग आहे, आपण फिट नसलो तर आपले कर्त्यव्य व्यवस्थित बजावता येत नाही. सर्वांनी स्वतःसाठी वेळात वेळ काढून कमीत कमी एक तास नियमित व्यायाम करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक (गृह) मनोज वाडिवे, पोलीस निरीक्षक कांचन पांडे, संजय गायकवाड, गोपाल भारती, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र रेवतकर, लक्ष्मण लोकरे, विनीत घागे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले तसेच पोलीस मुख्यालय, वर्धा येथे कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्याकरीता राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर व पोलीस मुख्यालय येथील कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.