ओबीसींचे ७२ वसतीगृह व ज्ञानज्योती आधार योजना त्वरीत सुरू करा!
अन्यथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे मतदारसंघात ओबीसी आंदोलन करू!
महात्मा फुले समता परीषदेने ओबीसी मंत्री अतुल सावे यांना दिले निवेदन!
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झालीत, पण महाराष्ट्रातल्या सामान्य ओबीसी मुलामुलींना अजुनही शासकीय वसतीगृहाचा लाभ मिळाला नाही. म्हणुन राष्ट्रीय ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांनी, नागपुरच्या मागील हिवाळी अधिवेशनात २७ डिसेंबरला ओबीसींची शासकीय ७२ वसतीगृहे व्हावीत, तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळत नसेल, त्यांना एस सी व एसटी च्या धर्तीवरच वर्षाला ६० हजार रूपये देणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यावर त्याच अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी याला मान्यता देवुन, मागील वर्षातच ओबीसींची वसतीगृहे व २१हजार सहाशे विद्यार्थ्यांना स्वाधार योजना सुरू करण्याची घोषणा २९ डिसेंबर २०२२ ला केली. पण मागील वर्ष गेले, नविन शैक्षणिक वर्ष अर्धे झाले, तरी ना ओबीसींचे शासकीय वसतीगृह सुरू झाले, ना ज्ञानज्योती आधार योजना. त्यामुळे बाहेरगावी शिकणारे ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनी हे हतबल झाले, त्यामुळे नागपुरला महाज्योतीच्या कार्यालयात महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने, ओबीसी मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष श्री अतुल सावे यांना, ही वसतीगृहे व आधार योजना त्वरीत सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी १३ सप्टेंबरला अर्थ विभागाची मिटींग घेवुन, ओबीसी वसतीगृहाच्या संपुर्ण खर्चाला व आधार योजनेला अर्थविभागाची मान्यता दिली. त्या सभेला छगन भूजबळ तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे हे सुध्दा उपस्थित होते.
असे असतांना अजुनही मंत्रीमंडळासमोर हा विषय जात नाही, व शासन निर्णयही निघत नाही. याबाबत निवेदनात खंत व्यक्त करण्यात आली. महाज्योतीच्या वतीने, जेईई निट विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेशात व टॅब वाटपात कपात करून ती दहा हजारावरून केवळ चार हजार करण्यात आली. ती पुर्ववत दहा हजार करावी, अशी मागणी करण्यात आली. महाज्योतीच्या पुणे येथील एमपीएससी युपीएससी व इतर विद्यार्थ्यांना फक्त १० हजार महिना स्टायपेंड मिळते. ती कमी आहे,ती १५ हजार करावी,दिल्लीसाठी १८ हजार करावी, सारथीच्या तुलनेत महाज्योती फारच मागे आहे. दिड वर्षापासुन २९ कोटी रूपये देवुन,महाज्योतीच्या मुख्यालयासाठी घेतलेली जागा तशीच पडुन आहे. महाज्योतीचे स्वतंत्र कार्यालय, प्रशिक्षण केंद्र नागपुरात व्हावे, सर्व महसुली विभागात महाज्योतीची अद्यावत विभागीय कार्यालये व्हावीत, तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला महाज्योतीचे २०० मुलींचे प्रस्तावित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे निवासी स्पर्धा पुर्व प्रशिक्षण केंद्र, ज्यासाठी शासनाने २४ कोटी रूपयाचा शासन आदेश ७ मार्च २०२२ काढला, ते त्वरीत सुरू करावे,अशा मागण्या निवेदनातुन केलेल्या आहेत.जर या मागण्या पुर्ण झाल्या नाहीत, तर महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व ओबीसी मंत्री अतुल सावे, यांचे मतदारसंघात नागपुर आणि औरंगाबाद ला आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमुद केले आहे.
ओबीसी मंत्री अतुल सावे यांना निवेदन देतांना महात्मा फूले समता परीषद नागपूर चे जिल्हा संघटक मनोज गणोरकर, नागपूर जिल्हा महीला अध्यक्षा, विद्या बहेकार, सचिन मोहोड नागपूर जिल्हा महासचिव, जयश्री गाडगे नागपूर महानगर महीला उपाध्यक्षा,आरती पाचघरे नागपूर महानगर महीला महासचिव,योगेश ठाकरे नागपूर ग्रा.ता.अध्यक्ष अड.विवेक सावरकर, अर्चना भगत, विक्रम राऊत, दामोधरजी सुर्वे, सरोज देशमुख, अस्मिता हातमोडे, विजय मुळे व समता परीषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.