समुद्रपूर परीसरातील वायगाव गोंड पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम राबवून केली कार्यवाही.
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी नवरात्री बंदोबस्त दरम्यान पो.स्टे. समुद्रपूर परीसरातील वायगाव गोंड पारधी बेड़ा येथे दि.13/10/2023 रोजी प्रभावी वॉशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारातून 23 प्लास्टीक व लोखंडी ड्रममधील 3,700 लीटर मोहा सडवा रसायण, 120 ली गावठी मोहा दारू व भट्टी साहित्य असा जु.किं. 2,08,800 रू. चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला. सदर मोहिमेदरम्यान आरोपी नामे 1 ) शिल्पा असुंदराज भोसले, 2) सोनी अनंत भोसले, 3) शिला विलास भोसले, वय 32 सर्व रा. वायगाव गोंड पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस. बी. शेगांवकर सा. यांचेनिर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. पंकज मसराम, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे, व गृहरक्षक दलाचे 05 जवानांनी केली.