महिला मंडळा द्वारे साजरा झाला शारदोत्सव.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
शारदा चा अर्थ शिक्षण देवी ; सरस्वती असा आहे. पवित्र ज्ञान आणि बुद्धीची मूर्ती असल्यामुळे देवी सरस्वतीला शारदा म्हणून सुद्धा संबोधले जाते.
सलग आठ वर्षापासून साजरा होत असलेला हा शारदोत्सव यावर्षी भाऊसाहेब सुर्वे नगर महिला मंडळ व लगतचा परिसर या दोन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला होता.
विविधता आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून हा शारदोत्सव कार्यक्रम ही महिला मंडळ जोपासत आहेत.
25 ऑक्टोबर 2023 ला जवाहर गृहनिर्माण सहकारी संस्था, सार्वजनिक वाचनालय, सुर्वेनगर येथे शारदा देवीच्या स्थापनेनंतर सलग तीन दिवस विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले होते. ज्यामध्ये फ्लावर डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा, सलाद तसेच पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, डान्स विविध खेळांमध्ये चमच्या लिंबू, बांगड्या लाटण, तीन पायाची स्पर्धा त्याचप्रमाणे गरबा तसेच लघुनाटिकेचे सुद्धा सादरीकरण झाले होते.
या महिला मंडळ कार्यकारिणीच्या अध्यक्षा सौ. वर्षा भोयर यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली. तर उपाध्यक्ष, सुषमा अवचट, सौ. चंद्रकला डोईफोडे कोषाध्यक्ष, सौ कमल निनावे, सौ अलका चौधरी सचिव, सौ उज्वला झाडे, सविता राऊत सहसचिव, डॉक्टर अर्चना रामटेके ,श्रीमती गीता बोरकरकार्यकारणी सदस्य, सौ वर्षा साठे, सौ अर्चना महाजन, सौ नंदा मिरे ,श्रीमती शिला कावळे, सौ ज्योती देवतळे यांच्या अथक परिश्रमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेवटल्या दिवशी सायंकाळी संगीत सृजन समिती या जेष्ठा द्वारा प्रस्तुत संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. बक्षीस वितरणानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.