प्रतिनिधी अनिल के. बालपांडे, नागपूर.
उमंग मुख्यालय उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपविभाग, नागपूर तसेच स्टेशन मुख्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 0930 ते 1230 दरम्यान कविवर्य, सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे विदर्भातील माजी सैनिकां करिता आयोजित करण्यात आला होता.
मेजर जनरल, एस. के. विद्यार्थी, (AVSM, SM )जनरल ऑफिसर कमांडीग , UM &G Sub Area ,नागपूर
यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सी.आर.ओ. जीआरसी रेकॉर्ड, एडमिन कमांडंट, स्टेशन कमांडर, कमांडर जीआरसी, कर्नल वेटरन, ओआयसी स्टेशन कॅन्टीन, ओआयसी पॉलीक्लिनिक, ग्रुपकॅप्टन, मंचला मारिया तसेचजिल्हा सैनिक वेल्फेअर ऑफिसर, मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित वेटरन्स मधून काहींना प्रत्यक्षात उद्भवलेल्या ज्वलंत समस्या व परिस्थिती बाबत जनरल ऑफिसर कमांडिंग यांना प्रश्नांदारे अवगत करण्यात आले व आपले विचार मांडलेत. अल्पावधीत त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. इतकेच नसून त्यांचा फीडबॅक सुद्धा पुरविण्यात यावा बद्दलचे निर्देश मंचावर उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत. भविष्यात काही योजनांची माहिती तसेच कॅन्टीन सुविधांमध्ये आणखी काय भर होणाऱ बद्दलची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली.
या मेळाव्यामध्ये तक्रार निवारण केंद्र,मेडिकल चेकअप तसेच डेंटल मेडिकल स्टॉल, माजी सैनिकांच्या कल्याणार्थ विविध योजनांसाठी रेकॉर्ड ऑफिस स्टॉल, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय द्वारा माहिती केंद्र, सीएसडी काउंटर, आयसीआयसीआय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादींचे स्टॉल ठेवण्यात आले होते.
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर येथील बऱ्याचश्या भूतपूर्व सैनिकांनी तसेच नागपूर मधील सर्व माजी सैनिक संघटना यांनीआपला सहभाग नोंदवून वरील सर्व सेवेचा लाभ घेतला. यावेळी शहिदांच्या वीर नारी, वीरमाता, वीरपिता या सर्वांची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या सर्वांना यावेळी पुरस्कृत सुद्धा करण्यात आले. या सर्वांनी मुख्य अतिथीं सोबत स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.