सीधे मुख्य सामग्री पर जाएं

दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी काम करा बच्चू कडू अभियान अध्यक्षांकडून दिव्यांग कल्याणाचा आढावा

 


दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी काम करा बच्चू कडू अभियान अध्यक्षांकडून दिव्यांग कल्याणाचा आढावा

🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757

वर्धा, दि. 13 दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. परंतू त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कालमर्यादेत त्यांच्यापर्यंत योजना व राबविण्यात येणारे उपक्रम कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करा. घरकुलासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. परंतू अद्यापही अनेक दिव्यांगांना घरे मिळाले नाही. जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, यासाठी काम करा, असे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभाग व महामंडळांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत श्री.कडू यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अद्याप दिव्यांगांच्या प्राथमिक गरज देखील पुर्ण झालेल्या नाही. जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी कालमर्यादा निश्चित करा. दिव्यांगांसाठी राखीव 5 टक्के निधी खर्च होईल याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवा. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा विषय तहसिलदार, अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पुरवठा निरिक्षक तर वैश्विक ओळखपत्र, विविध प्रमाणपत्र त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना शक्ती केंद्र करा, असे श्री.कडू यांनी सांगितले.

दिव्यांगांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावे. दिव्यांग जन्मालाच येऊ नये. जन्माला आलेल्या दिव्यांग बालकांवर वेळीच उपचार करून त्याचे दिव्यांगत्व नाहीसे करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जावे. दिव्यांगांना कृत्रिम अंगांचे वितरण केले जातात, हे अंग उत्तम दर्जाचे असावे.

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रमांची ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जावे. सर्वसाधारण लाभार्थ्यांसह दिव्यांगांना घरकुलाचा प्राधान्याने लाभ दिला जातो. अनेक दिव्यांगांना घरे मिळाली नाही. घरकुलासाठी शासनाचे अनुदान कमी आहे. या अनुदानात घर बांधणे शक्य नाही. जिल्ह्यात घरकुलाचे उद्दिष्ठ वाढविण्यासोबतच अनुदानाच्या वाढीसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री.कडू यांनी दिले.

वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा जिल्हा आहे. गांधीजींनी या जिल्ह्यात मोठे काम केले आहे. जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील दिव्यांगांसाठी चांगले काम करावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. दिव्यांगांसाठी येत्या काळात जिल्ह्यात चांगले काम होईल. दिव्यांगांसाठी असलेल्या योजना, उपक्रमांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू असे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...