पोस्टल /जिओलॉजिकल आणि पेन्शनर्स असोसिएशन द्वारा साजरा केला 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.
समान समाज निर्मिती तसेच कर्मचारी एकत्रीकरण या उद्देशाने हा 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन लोकमत चौक ते दीक्षाभूमी रोडवरील रेनबो हॉस्पिटल समोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑल इंडिया पोस्टल एससी/ एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन, नागपूर शहर विभाग, नागपूर ऑल इंडिया जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया एससी/ एसटी वेल्फेअर असोसिएशन, नागपूर एम्पलोयीज अँड पेन्शनर्स असोसिएशन ऑफ एससी, एसटी, ओबीसी अँड मायनॉरिटीज, नागपूर प्रज्ञाशील करुणा ग्रुप (सी. जी. एच. एस.) नागपूर तसेच इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
सलग तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 ला सायंकाळी प्रबोधन आणि प्याऊ या कार्यक्रमाचे उद्घाटन जयराम जाधव, सर्कल सेक्रेटरी (महाराष्ट्र आणि गोवा) यांच्याद्वारे झाले. बी. एम. मेश्राम, सेवानिवृत्त वरिष्ठ डाक अधीक्षक, नागपूर यांच्या अध्यक्षखाली झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सुरज डी. पाठबाजे, अप्पर महानिर्देशक, खान मंत्रालय हे लाभले होते. डॉक्टर विलास खरात, राष्ट्रीय प्रभारी, बुद्धिस्ट नेटवर्क तसेच जावेद कुरैशी (पाशा) सेवानिवृत्त प्राध्यापक तसेच लेखक या प्रमुख वक्तांनी यावेळी आपले विचार मांडलेत.
मंगळवार सकाळला डॉक्टर विराज शिंगाडे, बाल अर्थशल्यचिकित्सक यांनी "निशुल्क आरोग्य शिबिर तसेच औषधी वितरण" च्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. डॉक्टर माधुरी बारसागडे अध्यक्ष म्हणून तर मुख्य अतिथी म्हणून शोभा मधाळे, पोस्टमास्तर जनरल, नागपूर परीक्षेत्र म्हणून लाभल्या होत्या. सायंकाळी आनंद शिंदे, राजू बागुल, परमानंद भारती, सुषमा देवी यांचा कव्वाली प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला.
बुधवार सकाळी आठ वाजता प्याऊ आणि भव्य भोजन वितरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली.