*उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था तात्काळ सुरळीत करा राष्ट्रवादी युवक कांग्रेस आक्रमक*
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील होत असलेली रुग्णांची गैरसोय त्वरित थांबवा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यू व वायरल इन्फेक्शनची साथ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशातच उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट संदर्भात अनेक तक्रारी सातत्याने नागरिकांकडून येत होत्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत राष्ट्रवादी कांग्रेसचे जेष्ठ नेते अॅड सुधीर कोठारी व माजी आमदार राजू तिमांडे, शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाणे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे धडक देत रुग्णालयाची पाहणी केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यू व वायरल इन्फेक्शनची साथ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. साथीच्या रोगामुळे रुग्णालय भरगच्च भरुन आहे. अश्यातच उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट येथे औषधीचा तुटवता मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. बऱ्याचश्या औषधी रुग्णांना बाहेरून मागवाव्या लागत असलेल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. आलेल्या रुग्णांना योग्य तो उपचार वेळेवर मिळत नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना उपचारा अभावीच जगाचा निरोप घ्यावा लागत आहे. सोबतच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उद्घाटपणे रुग्णांशी वागणूक करत असल्याच्या तक्रारी स्थानिक रुग्णांकडून प्राप्त होत आहे. सोबतच रुग्णालयातील अस्वच्छता पाहता रुग्णालयाने अस्वच्छतेचा कळस गाठला असल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव आणि अमृत कलश अशे सोहळे साजरे करत असतांना देशाची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटीलेटर असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या अमृत काळात जिव मुठीत घेवून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. हि आम्हा सर्वांसाठी शरमेची बाब आहे.
नुकत्याच झालेल्या नांदेड-ठाणे येथील शासकीय रुग्णालयाच्या घटना बघता जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पाहता सामान्य नागरिकांमधे भीतीचे वातावरण तयार झाले असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील होणारी गौरसोय थांबवावी व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व परिचारिका यांना योग्य ती शिस्त आणि समज द्यावी व आरोग्य यंत्रणा सुरळीत करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लिलाधर मडावी यांनी निवेदनातून केली आहे.
निवेदन देते वेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे हिंगणघाट शहर अध्यक्ष विठ्ठल गूळघाणे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे प्रदेश सरचिटणीस शिवराज शिंदे, माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, जिल्हा सरचटणीस जितेंद्र शेजवल, राष्ट्रवादी ओ.बी.सी. विभाग वर्धा जिल्हाध्यक्ष हरीश काळे, रा.यू.कॉ शहर अध्यक्ष पंकज पाके, शहर कार्यकारी अध्यक्ष सुरेंद्र टेंभुर्णे, शहर उपाध्यक्ष प्रविण काळे, नरेश पंपनवार, युवराज माउसकर, अमोल त्रिपाठी, हर्षल तपासे, संगेश ससाणे, गुणवंत कामडी, पवन काकडे, शुभम पिसे, जयदेव दारुंदे, सक्षम लोखंडे, वैभव तुराळे, बावा तामगाडगे इत्यादी उपस्थित होते.