दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्रात सुरु असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ प्रदर्शनात नृत्य सादर करताना कलावंत
दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्रात सुरु असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ प्रदर्शनात नृत्य सादर करताना कलावंत
‘मेरी माटी मेरा देश’ प्रदर्शनाचे उद्घाटन थाटात
नागपूर – समाजाच्या सर्वस्तरातून पाठिंबा मिळाला तरच हातमाग, हस्तकला, लोककला आणि लोकसाहित्य भरारी घेऊ शकेल, असे विचार माजी नगरसेविका परिणिता फुके यांनी शुक्रवारी व्यक्त केले. भारतीय कला, पेहराव, दागिने आणि पारंपारिक गृह संस्कृतीचे प्रतिबिंब असलेले ‘मेरी माटी मेरा देश’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. आमदार निवासापुढील दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्रामध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी लोककला आणि लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. शनिवारी जादुचे प्रयोगही झाले. गृह सजावट, फर्निचरपासून फुडझोनपर्यंतची सुविधा या प्रदर्शात आहे. लोकनृत्य, ग्रामीण कला आणि कलावंतांना वाव देण्यासाठी अशा प्रदर्शानांची आवश्यकता असल्याचे मत वक्त्यांनी मांडले तसेच अशा उद्योजकांच्या पाठिशी राहणाऱ्या दक्षिण मध्य केंद्राविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली. दिवाळीची पूर्वतयारी करताना लोककलावंत आणि ग्रामीण भागातील उत्पादकांसोबत असल्याची प्रचिती ग्राहकांनी द्यावी, असे आवाहन यावेळी आयोजकांनी केले.