अभिनव फटिंग यांची सोशल मिडिया नागपुर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपुर शहर सोशल मिडिया अध्यक्ष पदी अभिनव फटिंग यांची प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे व महिला आयोग अध्यक्ष श्रीमती रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते मुंबई येथील पक्षाचे कार्यालय प्रतापगड येथे नियुक्ती करण्यात आली.
प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसान संघटना मध्ये अनेक वर्षांपासून सचिव पदावर अभिनव यांनी काम केले आहे. अनेक आंदोलनात, सामाजिक क्षेत्र आणि युवकांचे प्रश्नासाठी कार्य केली आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राजेंद्र जैन विदर्भ निरीक्षक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामे व उद्दिश्टे सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी या पदाला योग्य न्याय देण्याचे त्यांनी म्हटले. मुंबई येथील प्रतापगड कार्यालयात सोशल मिडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे, नागपुर शहर उपाध्यक्ष जयंत किणकर, निलिकेश कोल्हे इतर मान्यवर उपस्थित होते.