जय अंबे दुर्गा मंडळास उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर
पन्नासे लेआउट, नागपूर येथील शेवटचा बस स्टॉप जवळ जय अंबे दुर्गा उत्सव मंडळाद्वारा स्थापित असलेल्या दुर्गा मातेस हार अर्पण करून उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मातेचे आशीर्वाद घेतले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. महादेव काकडे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे शॉल देऊन स्वागत केले. यावेळी परिसरातील मान्यवरांची फार मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बाल कलाकारां द्वारा दांडिया या नृत्याची प्रस्तुती देखील यावेळी देण्यात आली.
मागील 18 वर्षापासून स्थापन झालेल्या या मंडळाद्वारे परिसरातील नागरिकांसाठी विशेष करून लहानांसाठी बरेचसे कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्राचे नवही दिवस भरगच्च कार्यक्रमात परिसरातील नागरिक उत्साहाने सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणीत करतात. यावर्षी सुद्धा महाप्रसादा नंतरच देवीचे विसर्जन होईल.