राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी एकमताने निवड
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
वर्धा, दि११ : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धा जिल्हा अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांची एकमताने निवड करण्यात आली. महासंघाच्या जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीत त्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.ज्ञानदा फणसे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार रमेश कोळपे, वैद्यकीय अधिकारी डॅा.कल्पना सुनतकारी, पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॅा.प्रवीण तिखे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कक्षात अध्यक्ष निवडीबाबत आज अधिकाऱ्यांची चर्चा झाली. यावेळी सर्वानुमते श्री.फुलझेले यांच्या नावावर सहमती झाल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन व स्वागत केले. पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महासंघाची जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात येणार आहे.
नवनियुक्त अध्यक्ष श्री.फुलझेले हे महसूल विभागातील जेष्ठ अधिकारी असून त्यांनी वर्धा येथे नियुक्त होण्यापुर्वी यवतमाळ, अमरावतीसह विविध जिल्ह्यांमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यापुर्वी मंत्रालयात दोन वर्ष ते कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. यवतमाळ येथे निवासी उपजिल्हाधिकारी असतांना महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही वर्ष जबाबदारी पार पाडली, असे महासंघाचे प्रसिध्दी सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी कळविले आहे.