वन सप्ताहदरम्यान वन्यजीव संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर/पारशीवणी : पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. त्यासोबतच या पर्यावरणातील जीव जंतू यांचेही संरक्षण करणे काळाची गरज आहे. असाच लुप्त होत चाललेला नाग व इतर प्रजातींचे सापांचे संरक्षण कसे करावे यासंदर्भात पारशीवणी वनविभागाने सरोजिनी पब्लिक स्कूल येथे अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पारशिवनी वनविभाग, सरोजिनी पब्लिक स्कूल तसेच सई अधी स्नेक फ्रेंड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पारशिवनीच्या सरोजिनी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहअंतर्गत वन्यजीव संवर्धनाविषयी माहिती देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका शारोन क्रेग यांच्या अध्यक्षतेत तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांच्या मार्गदर्शनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राऊंड ऑफिसर जगदीश चवरे, नरेश नगरारे, विश्वास कुंभारे, वनरक्षक प्रवीण पिल्लारे, वनरक्षक स्वप्निल डोंगरे, सई-अधी स्नेक फ्रेंड फाउंडेशनच्या संस्थापिका कृपाली स्वप्निल डोंगरे, सामाजिक कार्यकर्ता व वरिष्ठ पत्रकार शेखर गजभिये, वनरक्षक सोनाली ढोरे तसेच पारशीवणी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी आणि निमविषारी सापाबद्दल माहिती देण्यात आली. साप शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्याला न मारता त्याचे संरक्षण करावे असा संदेश यावेळी मुलांना देण्यात आला. यानंतर विषारी व बिनविषारी सापांना त्यांच्या अधिवासात म्हणजेच जंगलात मुक्त करण्यात आले.
याप्रसंगी वनरक्षक स्वप्निल डोंगरे, सर्पमित्र धम्मरक्षित बेलेकर, अमित पराते, गौरव भगत, विपासवी डोंगरे, अधिष्ठान डोंगरे आदी उपस्थित होते.