सोन्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारे दोन कुख्यात गुन्हेगार समुद्रपूर पोलीसांच्या जाळात
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी : फिर्यादी नामे नईमुद्दीन मोहियोद्दीन काजी हे जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून,काही दिवसापुर्वी त्यांचेकडे दोन ईसम आले व त्यांना म्हणाले कि, त्यांचेजवळ खोदकामामध्ये मिळालेले सोने असून, त्यापैकी एक सोन्याचा तुकडा सॅम्पल म्हणुन फिर्यादीस दाखविला. त्यावरून अंदाजे 01 किलो वजनाचा सोन्याचा हार त्यांचेजवळ असल्याचे फिर्यादीस सांगितल्याने, तो खरेदी करण्याबाबत फिर्यादीस म्हटलेवरून, फिर्यादीने कि 10,00,000 रू. मध्ये सदरचा सोन्याच्या हार खरेदी करण्याची संमती दर्शविल्याने, दि. 03/10/23 रोजी मौजा जाम चौरस्ता सदर हार खरेदी करण्याचे ठरलेप्रमाणे फिर्यादी व त्यांचा मुलगा हे त्यांचे क्रेटा गाडीने मौजा जाम येथे आले. व तेथील एका चहाचे टपरीवर त्यांनी आरोपी नामे प्रभु लालसिंग चव्हाण, वय 42 वर्ष, रा. वानखेडे ले–आउट उमरेड, जि. नागपूर (खोटे नाव राजु) व रूपसिंग लक्ष्मणसिंग चव्हाण, रा. जोगिठाणा पेठ (खोटे नाव प्रजापती) यांना 10,00,000 रू देवून हार खरेदी केला. व चंद्रपूर करीता रवाना झाले. रस्त्याने जात असतांना, त्यांनी हाराची पाहणी केली असता, तो नकली बनावटी असल्याचे त्यांना दिसून आल्याने, त्यांचेसोबत फसवणुक झाल्याचे समजताचं, त्यांनी पो.स्टे. समुद्रपूर येथे येवुन,दिलेल्या रिपोर्टवरून दोन्ही आरोपी ईसमांविरूध्द अप क्र. 703/23 कलम 420, 34 भा.द.वी. अन्वये फसवणुकिचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरचा गुन्हा नोंद होताचं समुद्रपूर पोलीसांनी तांत्रिक पध्दतीने गुन्ह्याचा तपास करीत आरोपी प्रभु लालसिंग चव्हाण, वय 42 वर्ष, रा. वानखेडे ले-आउट उमरेड, जि. नागपूर (खोटे नाव राजु) यास अटक केली असुन, दुसरा आरोपी रूपसिंग लक्ष्मणसिंग चव्हाण, रा. जोगिठाणा पेठ उमरेड (खोटे नाव प्रजापती) हा सद्या फरार आहे. अटक आरोपीकडून गुन्ह्यातील नगदी 10,00,000 रू जप्त करण्यात आले असून, अटक आरोपीचा दि 07/10/23 पर्यंत पि.सी.आर. प्राप्त करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेणे सुरू असुन, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे
निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. अनिल देरकर, पंकज मसराम, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.