सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल्य संग्रामाचा इतिहास सांगणारे नाटकाचा सादरीकरण




 मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल्य संग्रामाचा इतिहास सांगणारे नाटकाचा सादरीकरण उद्या, १८ सेप्टेंबर, कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदाना जवळ, हिंगोली, ता. हिंगोली, जि. हिंगोली, सायंकाळी ७ वाजता होणार आहे.       

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचनालय, सांस्कृतिक कार्य विभागाने "गाथा मुक्तीसंग्रामाची" या दोन अंकी नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटक चे प्रयोग संलग्न मराठवाड्याच्या ७६ तालुक्यात दिनांक १८ सेप्टेंबर पासून सादर होणार आहे. आपण या नाटकातील कलाकारांच्या कार्यकलेच्या माध्यमातून मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या जाणून घेऊ शकतो. 

या नाटकाच्या संवादांच्या माध्यमातून, आपल्याला मराठवाड्याच्या शूरवीर, स्वातंत्र्यलढ्यांच्या महागाथेच्या अंशांकिता मिळेल. या नाटकचे सादरीकरण दिनांक १८ सेप्टेंबर टे २७ सेप्टेंबर २०२३, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात, हिंगोली, वसमत, आढानागनाथ, कळमनुरी, सेनगाव, हदगांव, परभणी, पालम, गंगाखेड आणि सोनपेठ या १० या ठिकाणी होणार आहेत. 

उपर्युक्त ठिकाणी नाटकचे सादरीकरण आर्टिस्टिक ह्युमन्स संस्था, मुंबईच्या वतीने होणार आहे, यात सहभागी कलाकार मैत्रेय भंडारे, प्रकाश सावळे, शिवम परमार, पारस वीरा, शौर्य राऊत, जान्हवी कांबळे, शर्वरी जुकर, ओमप्रकाश तुडमे, निखिल सोनी, आलोक शुक्ला, केतन आढाव, निमित डोबरिया, अनुभा गुप्ता, श्रेयस खरबडे आणि दर्शन महाजन आहेत. 



या नाटकाचं लेखक डॉ. सतीश साळुंके, ॲड. शैलेश गोजमगुंडे 

आणि दिग्दर्शक प्रमोद शेलार यांनी केलं आहे.    

प्रकाश योजना, ओमकार घोडके आणि शासनाच्या वतीने तालुका समन्वय दर्शन महाजन 

स्थानिक नियोजन सहयोग आस्मा अंसारी यांनी दिल आहे. 

पूढील प्रयोगाची यादी: 

सोमवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.स्थळ: कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदाना जवळ, हिंगोली, ता. हिंगोली, जि. हिंगोली.

२. दिनांक: मंगळवार १९ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.स्थळ: केंब्रिज स्कुल ऑफ स्कॅालर्स, कळमनुरी,ता. कळमनुरी, जि. हिंगोली.

३. बुधवार, दिनांक २० सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.स्थळ: नगरपंचायत परिसर, औंढा (नागनाथ),ता. औंढा (नागनाथ), जि. हिंगोली.

४. गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.स्थळ: वी. के. देशमुख मंगल कार्यालय, बस स्टैंड जवळ, सेनगांव ता. सेनगांव, जि. हिंगोली

५. दिनांक शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.

स्थळ: जिल्हा परिषद शाळा, शनिवार बाजार, पालम,ता. पालम, जि. परभणी.

६. दिनांक: शनिवार, २३ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.स्थळ: पूजा मंगल कार्यालय, वकील कॉलोनी, गंगाखेड, ता. गंगाखेड, जि. परभणी.

७. दिनांक: रविवार २४ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, नगर परिषद, सोनपेठ,ता. सोनपेठ, जि.परभणी

८. दिनांक: सोमवार, २५ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ७.०० वाजता.स्थळ: सुरमई दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह, कारंजा चौक, वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली

९. दिनांक: मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३, संध्याकाळी ४.०० वाजता.स्थळ: श्री संत रोहिदास महाराज सांस्कृतिक सभागृह, बाजार परिसर, हदगाव.ता.हदगाव, जि.नांदेड.

१०. दिनांक: बुधवार, २७ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ६.०० वाजता.स्थळ: कृषी विद्यापीठ सभागृह, वसमत रोड, परभणी,ता. परभणी, जि. परभणी