विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्कृती संघटना नागपूर, यांच्या वतीने साविधन चौकात उपोषण व धरणा आंदोलन
विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्कृती संघटना नागपूर, यांच्या वतीने साविधन चौकात उपोषण व धरणा आंदोलन
विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्कृती संघटना नागपूर, यांचा वतीने सविधन चौकात आंदोलन करण्यात येत आहे.
विषय - शासकीय / अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचारी यांच्यावर शासन व प्रशासनाच्य वतीने अनेक शासननिर्णय वा परिपत्रके काढून अन्याय करीत असल्यामुळे त्या विरोधात दिनांक १६/०९/२०२३ रोज शनिवार पासून अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर (गिरीपेठ) समोर आमरण उपोषणला बसत असल्याबाबत.
खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या -
1) दि. 19 मे 2023 येथे मा. अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांच्या कार्यालयात पार पडलेल्या सभेचे इतीवृत्त कायम करुन केलेल्या कार्यवाही बद्दल संघटनेला व मा. शिक्षक आमदार यांना तात्काळ लेखी कळविण्यात यावे.
2) शासननिर्णय ८ जून २०१६ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावे.
3) समायोजीत क र्मचाऱ्यांचे सेवाखंड कालावधी क्षमापीत करुन सदर कालावधीचा वेतन इतर अपर आयुक्त कार्यालयाप्रमाणे अदा करण्यात यावे.
4) वेतन देयकावर संस्था चालकांची स्वाक्षरी अनिवार्य करण्याबाबतचे प्रस्तावित पत्र मा. आयुक्त सो. यांनी तात्काळ रद्द करावे.
5) शासकीय/अनुदानित मधील कार्यरत शिक्षकांची क्षमता परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावे.
6) निपुण भारत अभियानांतर्गत सुक्ष्म अध्ययन स्तर निश्चिती परीक्षा दि.१५/०९/०२३ हि तात्पुर्ती स्थगीत करुन सदर तारीख पुढे ढकलण्यात यावी.
7) नवीन वेळापत्रक रद्द करण्यात यावे.
8) सार्वजनिक हिंदू व इतर सणाच्या दिवसी तपासणी पथके रद्द करुन सामाजिक भावना व सार्वजनिक/धार्मीक सण साजरा करण्याचा अधिकार कायम ठेवण्यात यावा.
9) अल्पसख्यांक संस्थेमध्ये समायोजनाने कर्मचाऱ्यांना समायोजित करून घेण्यात यावे.
10) मा.अप्पर आयुक्त सो. नागपूर यांचा आश्रम शाळा भेट दौरा दि. ०८/०९/०२३ ते दि.१८/०९/०२३ पर्यंत नियोजित केला आहे. सदर दौरा पुढे ढकलण्यात यावे. (दि. ०१/०९/०२३ च्या VC मार्फत मिळालेल्या सूचना) दि.07/09/2023 मा.प्रकल्प अधिकारी चिमुर यांचे अन्याय कारक आदेश रद्द करण्यात यावे.
11) आदिवासी विकास नागपूर/नाशिक/मुंबई येथे प्रलंबित असलेले सर्व मेडिकल/सर्व प्रलंबीत प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे.
12) दि.१९/०५/०२३ रोजी झालेल्या सहविचार सभेतील सर्व प्रश निकाली काढण्यात यावे. (उदा. श्रीमती लिलाबाई सदाराम पुराम यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती प्रकरण, चिमुर प्रकल्पातील अनु. आशा. भिसी येथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यात)
13) शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करण्यात यावा.
14) इयता १० वी १२ वीचे निकाल ८०% व ५०% पेक्षा कमी लागल्यास होणारी होणारी वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही तात्काळ रद्द करून शिक्षकांना विश्वासात घेऊन विध्यार्थी गुणवत्तेसाठी नियोजन करावे.
15) कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा असणाऱ्या ठिकाणी कार्यरत प्रयोगशाळा परिचर यांना पदोन्नती देण्यात यावी.
16) श्री. हरिश जेट्टीवार (उ.मा.शी.) यांचे समायोजन नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळेमध्ये करण्यात यावे. आणि उर्वरीत सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन तात्काळ करण्यात यावे. 17) समायोजनामध्ये आरक्षणाची अट रद्द करण्यात यावी.
18) संस्था चालकाच्या नात्यातील नियुक्त कर्मचारी काम न करता फुकटचा वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची निस्पक्ष चौकशी करुन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी व सदर कर्मचाऱ्यांचा कामाचा तान इतर कर्मचाऱ्यांवर येत असतो त्यामुळे न्याय देण्यात यावा.
19) श्री.कापगते व इतर 5 कर्मचारी यांचे सेवाखंड क्षमापीत करण्याचा प्रस्ताव देवरी प्रकल्पातून सादर करुन सुध्दा अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही त्यासाठी त्वरीत निर्णय घेवुन कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात यावे.
20) महिण्याच्या 1 तारखेला वेतन करण्यात यावे व सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी बद्दल काटेकोपणे नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.
21) आमच्या अनुदानीत आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही शासकीय कामानिमीत्य प्रशिक्षण व इतर कामासाठी सहभागी होण्यासाठी आदेशीत केले जाते पण शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना प्रवासभत्ता व डी.ए. भत्ता अदा करण्यात येत नाही त्यासाठी शासनाने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमीत करावा.
22) सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रजा देण्यात याव्या.
23) शासकिय आश्रम शाळेत सेकडो प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षक तात्पुरत्या स्वरुपात कोणत्या शासन निर्णया नुसार भरती करण्यात आले. यांची संघटनेला माहीती देण्यात यावी कारण आमच्या अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचारी अतिरीक्त असतांना त्यांचे समायोजन शासकीय आश्रम शाळेमध्ये न केल्यामुळे एकीकडे आमच्या कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे व एकीकडे शासनाचा निधीचा गैरवापर होत आहे असे संघटनेचे ठाम मत आहे.
अश्या सगळ्या वरील मागण्यासाठी विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्कृती संघटना नागपूर, यांच्या कडून सविधान चौकात आंदोलन करण्यात येत आहे.
