*महाकाली नगरच्या राजाचे वाजत गाजत आगमन बारा वाजता झाली स्थापना !*
नागपूर : श्री बाल गणेश उत्सव मंडळ महाकाली नगर ३ नागपूर यांच्यावतीने गणेशोत्सवाला मंगळवारी धुमधडाक्यात वाजत - गाजत महाकाली नगरचा राजा चे आगमन तपस्या विद्या मंदिर चौकातून तर महाकाली नगर चौकापर्यंत लोकांच्या खचाखच गर्दीमध्ये श्री चे आगमन स्वराज्य गर्जना पथक द्वारा ढोल ताशाच्या तालामध्ये बाप्पांच्या आगमनाने रस्ते फुलून गेले होते. गणपती बाप्पा मोरया चा गजर ही गजर करीत रस्त्यावरील सहकुटुंबानी व लोकांनी मिरवणुकीचा आनंद घेतला. दक्षिण नागपूरातील अध्यापक नगर, महाकाली नगर, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर मधून मिरवणूक काढण्यात आली होती. बाप्पांची मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री 12 वाजता उशिरापर्यंत गणेशाचे विधी पूजन करून स्थापना करण्यात आली. अतुल लोंढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे मुख्य प्रवक्ते यांची उपस्थिती होती.
तसेच याप्रसंगी भोला कुचनकर, प्रवीण सांदेकर, आशीष काळे, सौरभ भोगांडे , निखिल फुलझले, रोहित ठाकरे, मनीष भिलकर, शुभम जांगडे, साहिल राऊत, शतक सहारे अजय वानखेडे देवेंद्र बघेले, आशिष शिरसाट, केवलराम पटोले, आशिष कुंतलवार, मोहन दहिकर, वेदांत कापटे,साहिल दहीकर, कुणाल फरताडेया सर्वांच्या उपस्थितीत बाप्पांचे आगमन झाले. या सर्वांनी खूप परिश्रम घेतले.