सिताबर्डी पोलीसांची वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण वाहन चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस आणले
नागपुर : दि २७.०९.२०२३ चे दुपारी १.३० वा. ते ५.३० वा. चे दरम्यान पो. ठाणे सिताबर्डी हद्दीत, इंस्टीटयुट ऑफ इंजिनियर, मेट्रो स्टेशन, सिताबर्डी नागपुर येथील पार्किंग मध्ये फिर्यादी कु. खुशी धिरज राजपुत वय १८ वर्ष रा. आशिर्वाद नगर, हुडकेश्वर यांनी आपली ज्युपीटर गाडी क्र. एम. एच ४९ बी. एन २५२१ किमती २५००० /- रू ची लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे सिताबर्डी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता...
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान सिताबर्डी पोलीसांनी मिळालेले माहिती वरून सापळा रचुन आरोपी रजत रमेशराव क्षीरसागर वय २३ वर्ष रा. वार्ड क्र. ५, बिनाजोड भानेगाव, ता. सावनेर, सध्या नागपुरला गवळीपुरा, सिताबर्डी, इथे राहत होता . यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत वर नमुद वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेले वाहन किमती २५,०००/- रू चे जप्त करण्यात आले. आरोपीची अधिक सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीतुन
२) होन्डा अॅक्टीव्हा क. एम.एच ३१ सी.वाय ५२२० किमती ६०,००० /- रू ची
३) होन्डा अॅक्टीव्हा क. एम.एच ३१ एफ.एन ६३४३ किमती ६०,००० /- रू ची
४) होन्डा अॅक्टीव्हा क. एम. एच ४९ टी २१३५ किमती ६०,००० /- रू ची
५) होन्डा शाईन क. सि.जी. ०४ एम.जी. ६१७९ किमती ७५,०००/- रू ची
६) स्प्लेंडर प्लस क्र. एम.एच ३१ बी. आर. ४२१६ किमती ५०,००० /- रू ची व पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतुन
७) पॅशन प्रो. क्र. एम. एच ४० ए. झेड. ८४०५ किमती ६०,०००/- रू ची असे वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या ताब्यातुन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपीकडुन एकुण सात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३,९०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परि. क्र. ०२, मा. सहायक पोलीस आयुक्त, सिताबर्डी विभाग वपोनि नरेंद्र हिवरे, पोनि गुन्हे श्रीमती राखी गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी संतोष कदम, पोउपनि विजय नेमाडे, पोहवा चंद्रशेखर गौतम नापोअ संदीप भोकरे पोअ शत्रुध्न मुंडे, प्रशांत भोयर, सचीन भोयर, विक्रमसिंग व मपोअं. जितु चौधरी यांनी केली.
👇Click Below to Read More News👇
राजस्थानी मेले का रंगारंग आयोजन-राजस्थानी ब्रम्ह समाज के सैकड़ों समाज बंधुओं, महिलाओं ने दी उपस्थिति