सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मनपा झोन निहाय गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू - अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्रणालीचे नागरिकांना मार्गदर्शन

 

मनपा झोन निहाय गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू

 - अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्रणालीचे नागरिकांना मार्गदर्शन


नागपूर, ८ ता. 

 गणेशोत्सव म्हटलं तर सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते असे असताना नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता विविध पाऊल उचलण्यात येत आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता मनपाद्वारे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली असून, सर्व दहाही झोन कार्यालयात एक खिडकीची व्यवस्था अर्थात गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

 नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील गणेशमंडळांना घरबसल्या परवानगी मिळावी याकरिता सोयीस्कर व सुलभ अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे. याशिवाय मनपाच्या दहाही झोन कार्यालयात एक खिडकीची व्यवस्था अर्थात गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्रावर नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, अग्निशमन विभाग आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत. केंद्रांवर अधिकारी गणेशोत्सव परवानगी करिता नागरिकांना मार्गदर्शन करीत असून, ज्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्यास त्रास जात आहे अशा नागरिकांना सर्तोपारी मदत करीत आहेत.


*उपअभियंता यांच्या संपर्क क्रमांकाची यादी खालील प्रमाणे*

श्री. अभिजित नेताम 9673999750

 श्री. पी. जी. मोकाडे 9923388095

 श्री. पी. एम. आगरकर 9823128271

श्री. पी.जे. आसलकर 9923209423

श्री. गिरीश लिखर 9890918039

श्री. प्रवीण कोठांगळे 9823062603

श्री. एन. एस. बोबडे 9823274661

श्री. देवेंद्र भोवते 9764336466

श्री. सुनील गजभिये 9923388044

श्री. प्रशांत सोनकुसळे 9823316644

*झोन निहाय पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी खालील प्रमाणे:* 

लक्ष्मीनगर झोन 1:- राहुल बेलदार: 7715908595

धरमपेठ झोन क्र. 2:- विकास तिडके: 9637402411

हनुमान झोन क्र. 3:- पंकज बावणे 8390458401

धंतोली झोन क्र. 4 :- शेख 9545170806

नेहरूनगर झोन क्र. 5:- प्रवीण वाकडे 7588537192

गांधीबाग झोन क्र. 6:- बिस्मिल्ला खान 9823092627

सतरंजीपुरा झोन क्र. 7:-युवराज वाघमारे 8975874100

लकडगंज झोन 8:- आदर्श भंडारे 7758097101

आशीनगर झोन 9:- सुजित चव्हाण 9011051150

मंगळवारी झोन 10:- संतोष खांडेकर 8329388805

*अशी करा नोंदणी*

 

ऑनलाईन गणेश मंडळ नोंदणी करण्यासाठी मनपाच्या 

https://nmcnagpur.gov.in/RTS/ws/user/login.do

या संकेतस्थळावर जा ‘रजिस्टर’वर क्लिक करून नाव, आडनाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक टाका व सेंड ओटीपी वर क्लिक करा. ओटीपी नोंदवून रजिस्टरवर क्लिक करा. नोंदणी झाल्यानंतर साईन इन मध्ये पुन्हा मोबाईल क्रमांक नोंदवा ओटीपी प्राप्त करून तो नोंदवा.



मनपाच्या संकेतस्थळाचे डॅशबोर्ड ओपन होईल. यात ‘गणेश मंडळ परवानगी’ वर क्लिक करा. परवानगी मिळविण्याची पद्धती अटी व शर्ती वाचून ‘ॲग्री’वर क्लिक करा. गणेश मंडप परवानगी चा अर्ज ओपन होईल. यात आवश्यक ती सर्व माहिती भरा.


गणेश मंडळाच्या मंडप स्थळाचा सविस्तर माहिती दर्शविणारा नकाशा अपलोड करा. यानंतर हमीपत्र, पोलिस परवानगी करिता खासगी जागेबाबत प्रमाणपत्र, वस्तीतील नागरिकांचे ना हरकत प्रमाणपत्र, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्यांचे हमीपत्र, मंडळातर्फे संरक्षणाकरिता नेमलेल्या स्वयंसेवक, सुरक्षा रक्षकांची यादी व संमतीपत्र, मंडळ पदाधिका-यांच्या नावाची यादी हे सर्व डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा, त्यात आवश्यक सर्व माहिती भरून स्वाक्षरी करा. यानंतर भरलेले हमीपत्र व इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून ते संकेतस्थळावर अपलोड करा. आवश्यक शुल्क भरा व व्हिव अँड प्रिंट वर क्लिक करून प्रिंट काढा आणि सबमिटवर क्लिक करा. यानंतर आपल्याला नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्डवर अर्जाची स्थिती तपासा यावर क्लिक करा. नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून अर्जाची सद्यस्थिती पहा.


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव.

 दारुच्या नशेत एसटी चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात.वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव. यवतमाळ – मदयधुंद अवस्थेत एस.टी. बस चालविने पडले महाग. २२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालकाची जेलम ध्ये रवानगी करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की दि.२२/०८/२०२३ रोजी सकाळी यवतमाळ ते छत्रपती संभाजी नगर ला जाणारी यवतमाळ आगाराची एस.टी.बस MH ४०CM ५१२१ हि दारव्हा बस स्थानकावरून २२ प्रवाशांसह रवाना झाली या बस मध्ये बालक म्हणुन नारायन मारोती एकुंडवार तर वाहक म्हणुन प्रशांत पांडुरंग भगत असे नेमणुकीस होते. बस दारव्हा येथुन निघुन कारंजा रोडवर ५ किमी अंतरावरील चिखली फाटा येथे पोहचली असता बस वेडी वाकडी धाऊ लागली प्रवाशांनी आरडा ओरड करताच चालकाने बस थांबविली व स्टेअरींग वर त्याने मान टाकली प्रवाशांनी चालकास विचारपुस केली असता तो पुर्णपणे दारूच्या नसेत असल्याचे व त्यास बोलता बघता देखील येत नसल्याचे दिसुन आले. या बाबत वाहक भगत यांनी दारव्हा आगाराला माहीती देताच आगाराच्या अधिका-यानी घटनास्थळी जावुन चालकास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला हजर केले. पोलीस स्टेशन ला देखील चालक नारायन ऐकुंडवार यास निट उभे राहता ये...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....