सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मंगळवारी १०३ पीओपी मूर्ती जप्त *एक लाख ४० हजार रुपये दंड वसूल ; मनपाच्या कारवाईला गती*

                       

  मंगळवारी १०३ पीओपी मूर्ती जप्त

*एक लाख ४० हजार रुपये दंड वसूल ; मनपाच्या कारवाईला गती*

नागपूर, ता. १२ : पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. मंगळवारी (ता.१२) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १०३ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

प्रतिबंधित पीओपी मूर्तीच्या विक्रीवर आळा बसावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने मूर्ती विक्री स्थळांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे जवान, पारंपरिक मूर्तिकार संघाचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांच्याद्वारे संयुक्तरित्या मूर्ती तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. पारंपरिक मूर्तिकार संघाच्या प्रतिनिधींकडून मूर्तीची तपासणी करून ती मातीची अथवा पीओपीची असल्याची शहानिशा केली जाते. पीओपी मूर्ती आढळताच तात्काळ मूर्ती जप्त करून संबंधितांवर १०००० रुपये दंडाची कारवाई केली जाते.

याअंतर्गत मंगळवारी (ता.१२) टेलिफोन एक्सचेंज चौक, भावसार चौक, चितारओळी या भागातील मूर्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ ठिकाणी पीओपी मूर्तींची विक्री होत असल्याचे दिसून आले. या सर्व विक्रेत्यांवर कारवाई करीत एकूण १०३ मूर्ती जप्त करण्यात आल्या व प्रत्येकी १०००० रुपये याप्रमाणे एकूण १४०००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी श्री. रोहिदास राठोड, गांधीबाग झोनचे श्री. सुरेश खरे, श्री नवकिसन शेंडे, श्री. लोकेश बासलवार, आशीनगर झोनचे श्री. रोशन जांभुळकर, उपद्रव शोध पथक सिव्हीलचे श्री. संजय खंडारे, गणेशपेठ पोलीसे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. महेद्र आंभोरे यांच्या चमूने ही धडक कारवाई केली. यावेळी पारंपारिक मुर्तिकार श्री सुरेश पाठक व श्री चंदन प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते.

*यांच्यावर झाली कारवाई*

रोशन मूर्ती भांडार टेलिफोन एक्सचेंज चौक (२४ मूर्ती), निधी गणेश मूर्ती आर्ट भावसार चौक (४ मूर्ती), स्वामी मूर्ती भांडार भावसार चौक (४ मूर्ती), अमूल्य आर्ट भावसार चौक (७ मूर्ती), गणेश मूर्ती भांडार भावसार चौक (५ मूर्ती), ज्योती गणेश भांडार भावसार चौक (२ मूर्ती), भावसार मंदिर भावसार चौक (१४ मूर्ती), लोणारे मूर्ती भांडार भावसार चौक (१४ मूर्ती), शाहु मूर्ती भांडार चितारओळी महाल (४ मूर्ती), सोनू मूर्ती भांडार चितारओळी महाल (३ मूर्ती), पंजाब लोणारे भावसार चौक (९ मूर्ती), स्वामी मूर्ती भांडार भावसार चौक (५ मूर्ती), विनोद गुप्ता भावसार चौक (३ मूर्ती), चहांदे मूर्ती भांडार न्यू पोलिस स्टेशन पाचपावली (५ मूर्ती).

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...