नागपूर विभागातून साहेबराव गुडधे यांना महाराष्ट्रातून BEST CLASSROOM QUALITY" चे प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित
नागपूर विभागातून साहेबराव गुडधे यांना महाराष्ट्रातून BEST CLASSROOM QUALITY" चे प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित
सन्मानपत्र वितरण सोहळा"
नागपूर : व्य.शि.व प्रशि.संचालनालय म.रा.आणि उद्यम लर्निंग फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेला "उद्योजकीय मानसिकता विकास" या उपक्रमाअंतर्गत शा.औ.प्रशि.संस्था ठाणे (मुलिंची) येथे उत्कृष्ट कार्य केलेल्या शिल्पनिदेशक/ गटनिदेशक यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम व्य.शि.व प्रशि. संचालनालय, म.रा.मुंबई विभागाचे संचालक दिगंबर दळवी यांच्या शुभहस्ते दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी पार पडला.
उद्यम शिक्षा प्रोग्राम च्यावतीने महाराष्ट्रातील निवडक 22 आय.टी.आय. तील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता वाढ़ावी याकरिता "स्टूडेंट लीडर्स प्रोग्राम" मार्च- जून 2023 करिता राबविन्यात आला होता त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागामधुन 17 मेंटोर इंस्ट्रक्टर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल या कार्यक्रमात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवन्यात आले.
तसेच त्यातील 7 मेंटोर इंस्ट्रक्टर यांना विशेष सन्मान व प्रशस्तिपत्र देऊन गौरवन्यात आले यामध्ये शा.औ.प्रशि.संस्था,नागपुरचे मेंटोर इंस्ट्रक्टर साहेबराव सुदामराव गुडधे यांना महाराष्ट्रातुन "BEST CLASSROOM QUALITY" चे प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्य.शि.व प्रशि.संचालनालय, म.रा.मुंबई विभागाचे संचालक दिगंबर दळवी साहेब,सहसंचालक गावित, जि.व्य.शि.व प्रशि.अधिकारी ठाणे महेश जाधव, येते साहेब, टिकोले व प्राचार्य सौ.सरला खोब्रागडे तसेच उद्यम टीम तर्फे रिद्धि पुणतांबेकर व सनी साबळे आणि महाराष्ट्रातील शिल्पनिदेशक व गटनिदेशक उपस्थित होते. उद्यम प्रशिक्षणकरिता शा.औ.प्रशि.संस्था नागपुरचे उपसंचालक प्रमोद ठाकरे, उपप्राचार्य किशोरी पंडिले, खेमलाल चांदेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच गटनिदेशक सिध्दार्थ मेहेरे, सागर गेडाम, हरीश निमजे, नारायण श्रीखंडे, गणेश बांते, सचिन चुड़े, दिलीप मस्की, मिलिंद देवघरे, सहदेव चव्हाण, मिथुन मधुमटके व सर्व सहकारी निदेशक, गटनिदेशक आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

