पी फ ची रक्कम खात्यात त्वरित जमा करा , आकुर्डी पी फ कार्यालया समोर आंदोलन
महावितरण कंपनी मध्ये मागील अनेक वर्षे सातत्याने व नियमीतपणे कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. सदरील कामगार नाममात्र कंत्राटदार यांच्या मार्फत नेमले जातात, या कंत्राटदारांना कडून कायद्यातील विविध तरतूदी चे पालन महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी होत नाही. असाच अनुभव कामगारांना व संघटनेला आहे , भविष्य निर्वाह निधी अंशदानातील अनियमिता 23 आक्टोबर 2023 पुर्वी न झाल्यास महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) राज्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पी फ कमिशनर कार्यालय समोर आंदोलन चालू करणार आहे असा ईशारा आकुर्डी पी फ कार्यालय समोर आंदोलन च्या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिलेला आहे.
पुण्यातील कोथरुड विभागातील कंत्राटी कामगारांच्या टेंडर सन 2010 ते 2012 या कालावधीत आबा स्वयंरोजोगर संस्था यांनी घेतले होते. कामगारांच्या वेतना मधुन दरमहा पी फ रक्कम वजावट करून भरण्यात आली नव्हती त्यामुळे संघटनेने आकुर्डी पी फ कार्यालय मध्ये तक्रार दाखल केली होती, मधील काळात आबा स्वयंरोजोगर संस्थावर लिक्वीडेटर ची नियुक्ती करण्यात आली, पण संघटनेने वारंवार पाठपुरावा करून 7 A नुसार चौकशी लावून पी फ रक्कम बाबतीत 13 88,904 / (तेरा लाख अठ्ठाऐशी नऊशे चार रू फक्त) लाख रू त्वरित जमा करण्या चे आदेश मा सहाय्यक भविष्य निर्वाह निधी कार्यालय आकुर्डी यांनी दिल्यावर संबंधित संस्थाचालक यांनी सदरील रक्कम सन 2019 मध्ये पी फ कार्यालय मध्ये जमा केली होती. पण जमा झालेली रक्कम अद्याप पर्यंत कामगारांच्या खाते वर जमा केली नव्हती त्यामुळे संघटनेने आकुर्डी पी फ कार्यालय समोर लाक्षणिक आंदोलन चालू केले होते या विषयावर वरिष्ठ 3 अधिकारी यांची नियुक्ती रिजनल कमिशनर मा श्री माने यांनी केली असुन या प्रश्नाचे निपटारा 13 आक्टोबर 2023 पुर्वी करून कामगारांना त्यांचे हक्कांच्या पैसे खाते मध्ये जमा केले जातील असे पत्र पी फ कमिशनर यांनी दिलेले आहे. त्यामुळे बेमुदत आंदोलन स्थगित केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिणीस राहूल, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, उमेश विस्वाद , कोथरुड विभाग अध्यक्ष वैभव कामठे, यशवंत महाडीक, रोहित कोळवणकर यांनी केले आहे.


