सीधे मुख्य सामग्री पर जाएं

*जीएमसी, आयजीएमसीची रुग्णांमधील विश्वासार्हता कायम ठेवा* - *प्रशासनाचे आवाहन*



 *जीएमसी, आयजीएमसीची रुग्णांमधील विश्वासार्हता कायम ठेवा - प्रशासनाचे आवाहन*

*अफवांना बळी पडू नका* 

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गुणात्मक सेवेसाठी कटीबद्ध*

*माध्यमांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती द्यावी*

*नागपूर, दि. ५* : शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणारे काही रुग्ण मुळातच वैद्यकीयदृष्ट्या अत्यवस्थ व गंभीर स्वरूपाचे असतात. त्यामुळे दिवसाला सरासरी आठ रुग्णांचा मृत्यू होतो. दररोज दाखल होणाऱ्या सरासरी हजारावर रुग्णांमध्ये ही मृत्यू संख्या आहे. शासन गुणात्मक रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नागपुरची वैद्यकीय व्यवस्था गरीब, गरजू आणि अत्यवस्थ रुग्णांसाठी तत्पर असल्याची ग्वाही, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

        स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (मेडिकल) आज प्रशासनामार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली. नागपूर हे मध्यभारतातील रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र असून गोरगरिबांना अफवांमुळे वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. माध्यमांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती द्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) व इंदिरा गांधी वैयकीय महाविद्यालया (आयजीएमसी) विषयी रुग्णांमध्ये विश्वासार्हता कायम ठेवावी, असे आवाहन आज जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.   

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करतांना अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांचेच मृत्यू झाले आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील तीन महिने पुरेल इतका औषधांचा साठा असून उत्तम सुविधा आहेत.मनुष्यबळाची जी काही कमतरता असेल ती येत्या दोन महिन्यात वर्ग-३ व ४ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतून पूर्ण करण्यात येईल अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिली.

    जीएमसी मधील रुग्णांच्या मृत्यूबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसृत झाले यावर स्पष्टीकरण देताना डॉ. इटनकर म्हणाले, बुधवार दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी जीएमसीमध्ये एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. यातील ११ रुग्ण दाखल करतानाच हे आयसीयुमध्ये घ्यावे लागले. एकजण जनरलवार्ड मध्ये दाखल होता.जीएमसीमध्ये दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या १ हजार एवढी असून बहुतांश रुग्ण हे गंभीर आजारी किंवा अपघातग्रस्त असतात. यातील सरासरी आठ ते दहा अत्यवस्थ रुग्णांचा दररोज मृत्यू होतो. त्यांनी यावेळी जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत जीएमसीमध्ये दाखल, बरे झालेले आणि मृत्यू झालेले रुग्ण यांच्यासह बेडची उपलब्धता आदी सुविधांची माहिती दिली.


       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस स्थितीवर लक्ष ठेवून असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधा व अधिकारी-कर्मच्याऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे डॉ. इटनकर यांनी सांगितले.

त्यानुसार २३३ परिचारिकांची (नर्स) भरती अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यात वर्ग- ४ च्या ५११ रिक्त पदांसह वर्ग-३ चे रिक्त पदे भरण्यात येतील. जीएमसीला आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला प्रत्येकी १३ कोटी आणि आयजीएमसीकरिता जिल्हा वार्षिक योजनेमधून ८ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. तर जिएमसी, आयजीएमसी या दोन्हीच्या बळकटीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एकूण ८०० कोटींची तरतूद केली आहे. पुढील ३ महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध असल्याचे डॉ. इटनकर यांनी सांगितले.

      शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यावर्षी या रुग्णाच्या अपडेशनसाठी शासनाने ५०० कोटी मंजूर केले आहे. तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील ३०० कोटी मंजूर करण्यात आले आहे. आपण स्वतः डॉक्टर असून दोन्ही मोठ्या वैद्यकीय संस्थांमधील रुग्णसेवा अविरत दर्जेदार राहील याकडे जातीने लक्ष ठेवून असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

        गेली ७५ वर्ष अहोरात्र या रुग्णालयांची रुग्ण सेवा गरिबांसाठी सुरू असून कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी रुग्णसेवेचा लाभ घ्यावा,असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

           

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...