वंदन’ सन्मान सोहळा रविवारी
सुचिता व श्रीकांत बनसोड यांना पुरस्कार
यवतमाळ – येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फॉउंडेशन यवतमाळच्या वतीने दिला जाणारा २०२३ यावर्षीचा प्रतिष्ठेचा 'वंदन' सन्मान सोहळा यावर्षी अकोला येथील एकविरा मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या सुचिता व श्रीकांत बनसोड या दाम्पत्यास जाहीर झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक महेश भवनमध्ये होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतीचिन्ह व ५१ हजार असे वंदन पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा वंदन सन्मानाचे आठवे वर्ष आहे. बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान धारेवाडी ता. कऱ्हाड येथील सुप्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख हे उपस्थित राहतील.
