*रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.3 ऑक्टोबर रोजी 67 वा वर्धापन दिन सोहळा हैद्राबाद मध्ये साजरा होणार - रिपाई (आठवले)*
*रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.3 ऑक्टोबर रोजी 67 वा वर्धापन दिन सोहळा हैद्राबाद मध्ये साजरा होणार - रिपाई (आठवले)*
नागपुर दी.३ आक्टोबर २३ - भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 67 वा वर्धापन दिन सोहळा येत्या दि. 3 ऑक्टोबर रोजी तेलंगणा राज्यातील हैद्राबाद मध्ये नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळील मुकररामजाही रोड वरील एक्झिबिशन ग्राउंड वर आयोजित करण्यात आला आहे. रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदास आठवले ओहळ्याचे अध्यक्ष स्थान भुषविणार आहेत.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान दिले. त्यांच्या संक्लपनेतुन, दुरदुष्टीतुन रिपब्लिकन पक्षाची संकल्पना निर्माण झाली. त्यांनी खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना व घटना लिहिली. त्यानुसार 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची ऐतिहासिक स्थापना नागपुरच्या पावन दिक्षाभुमिवर लाखों जनतेच्या उपस्थितित झाली. रिपाई (आठवले) पक्षाच्या वतिने वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला रिपब्लिकन पक्षाचा ऐतिहासिक वारसा सक्षम पणे ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. याचा पक्षाला सार्थ अभिमान आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेचा अभिमान आहे. ज्यांचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास, श्रद्धा आहे ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार पटतो त्या सर्वं भीमसैनिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळा साजरा करावा. असे आव्हान रिपाई(आठवले) पक्षाच्या वतिने करण्यात येत आहे.
रिपब्लिकन नाव आपल्या पक्षाच्या बॅनर मधून पुसले असले तरी डॉ बाबासाहेब आंबेडकारांच्या रिपब्लिकन संकल्पनेला तसूभर ही फरक पडला नाही. आम्ही अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत रिपब्लिकन राहू. रिपब्लिकन संकल्पना ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना असून रिपब्लिकन पक्ष ताकदीने देशभर पोहोचविण्याची गरज आहे. नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडून येऊन तिथे रिपाइं चा निळा झेंडा फडकला आहे. लक्षदीप पोंडीचेरी केरळ ते जम्मू काश्मीर पर्यंत देशातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन वारसा देशभरात, गावागावात निळा झेंडा फडकवीणे काळाची गरज आहे.
येत्या दि.3 ऑक्टोबर 2023 रोजी रिपब्लिकन पक्षाचा 67 वा स्थापना दिन हैद्राबाद येथील नामपल्ली एक्झिबिशन ग्राउंड वर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आहे.
अशी माहीति प्रसिद्धि पत्रकातुन विदर्भ प्रदेश(पुर्व)महासचिव बाळु घरडे यांनी दीली.
